‘पैशांचा विषय येताच दोन्ही देश थांबले’, भारत-पाकिस्तान संघर्षावर ट्रम्प यांचे पुन्हा विधान; म्हणाले, ‘११ महागडी विमाने पाडली’

‘पैशांचा विषय येताच दोन्ही देश थांबले’, भारत-पाकिस्तान संघर्षावर ट्रम्प यांचे पुन्हा विधान; म्हणाले, ‘११ महागडी विमाने पाडली’

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. मात्र भारताने त्यावर कधीही शिक्कामोर्तब केले नाही. बोर्ड ऑफ पिस कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प म्हणाले, “दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्ध भडकले होते. मग मी दोन्ही देशांच्या प्रमुखांना फोन लावला. कारण माझे दोघांशीही चांगले संबंध आहेत. मी पंतप्रधान मोदींना चांगले ओळखतो. मी दोन्ही देशांना सांगितले की, तुम्ही युद्ध करणार असाल तर मी तुमच्याशी व्यापार करणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे तात्काळ थांबवावे लागेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *