National Testing Agency (NTA) ने NEET UG 2026 पुनर्परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा रविवार 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर देशभरातील लाखो विद्यार्थी संभ्रमात होते.
NTA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (formerly Twitter) वरून अधिकृत माहिती देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आणि आधीची नोंदणीच वैध राहणार आहे.
पुनर्परीक्षेसाठी सुधारित प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. नवीन प्रवेशपत्रात परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्र, रिपोर्टिंग वेळ आणि आवश्यक सूचना नमूद करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी अफवा किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता फक्त NTA Official Website वरील अपडेट्सवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

